gallery/prin

         शिक्षण कार्याचं रोपटं , पुण्याच्या भूमीत लागलं , त्याच्या पारंब्या पांगून , आज वटवृक्षात रूपांतर झालं , येथील प्रत्यकाने आपल्या इवल्याश्या हृदयातून सर्वानाच आभाळाएवढं प्रेम दिल . अनेक कठीण प्रसंगातही ' येथे बहुतांचे हित ' हा कानमंत्र जपत सारं घडलं.

      पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर. पूर्वी ते शहरापुरतेच मर्यादित. शिक्षणाच्या ओढीने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणाकरिता येत. याच काळात शिक्षणापासून कोणीच वंचित राहू नये, या हेतूने सण १९८७ साली काळेवाडी परिसरात मराठवाडा मित्र मंडळाने एम.एम. विद्यमंदिर या शाळेची मुहुर्तमेढ रोवली. तेव्हापासून संस्थेचा प्रवास हा अविस्मर्नीय आहे. सण १९९४ साली इयत्ता ८ वी ची एकच तुकडी ज्यामध्ये १४ विध्यार्थी असा सुरु झालेला प्रवास आज शाळेच्या १२ तुकड्या व ८२० विध्यार्थी या वळणावर येऊन पोहोचला आहे.

संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शंकररावजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली लावलेले हो ज्ञानरूपी रोपटं आज कला, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रिडा या सर्वच क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत आहे. दरवर्षी जवळजवळ १०० टक्के लागणार शैक्षणिक निकाल, सन २०१६ - २०१७ साली मिळालेली व क्रीडा क्षेत्रातील मानाची समजली जाणारी चॅम्पियन ट्रॉफी , सन २०१६ - २०१७ साली विद्यलयास ' पिंपरी - चिंचवड परिसरातील उपक्रमशील शाळा ' असे मिळालेले नामांकन हे सर्व त्याचेच द्योतक आहे .

     शैक्षणिक वर्ष २०१८ - २०१९ मध्ये पिंपरी - चिंचवड शिक्षण विभागाकडून मिळालेला आदर्श शाळा पुरस्कार या सारखे मनाचे तुरे शाळेच्या शिरपेचात खोवले गेले .

परंतु धुळीपासून तो हिऱ्यापर्यंत अशी ही अजब कामगिरी करणे शक्य झाले ते सर्व संस्था पदाधिकारीच्या व सर्वानाच एकत्र घेऊन काम करण्याच्या हातोटीमुळेच.

"I would rather to be a man of character than to be a man of success"

- : Albert Einstein : -

हे उदात्त विचार विध्यार्थ्यांच्या कोमल मनावर बिंबवणाऱ्या माझ्या सहकारी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनीमुळेच .

अंतिमतः भगवंताकडे एकच मागणी

तुझं अवघा आकाश मी मागत नाही ,

क्षितिज कवेत घेण्याइतका पैसा मी मागत नाही ,

पिलांच्या पंखामध्ये बाळ येईपर्यंत ,

घरटं साकारायला या हातांना ,

आणी घट्ट उभं राहायला या पायांना देता आलं तर बळ दे ,

बस ..... इतकंच दान दे.....

 

 

 

 

सौ. विद्याराणी शंकर वाल्हेकर ( एम. एस. सी. बी. एड. - विज्ञान )